१ सप्टेंबरपासून दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांना १० हजारांचा दंड

    दिनांक  21-Aug-2019 17:33:09
 


केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली माहिती

 


नवी दिल्ली : संशोधित 'मोटार व्हेईकल अमेंडमेंट अ‍ॅक्ट'चे काही टप्पे १ सप्टेंबरपासून लागू केले जाणार आहेत. केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली. 'मोटार व्हेईकल अमेंडमेंट अ‍ॅक्ट'चा ६३ वा अधिनियम १ सप्टेंबरपासून लागू होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. या अंतर्गत वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.

 

या नियमानुसार, वेगमर्यादा ओलांडणारे वाहनचालक आणि मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांना पाच ते दहा हजारांचा दंड लागणार आहे. हे बिल दोन्ही सभागृहात पारित करण्यात आले आहे. अंतिम मंजुरीसाठी कायदे मंत्रालयाकडे सुपूर्द करण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन ते चार दिवसांत हे बिल लागू करण्यासाठी परिवहन मंत्रालयाकडे पाठवण्यात येणार आहे. या बिलावर राष्ट्रपतींची स्वाक्षरीही झाली आहे.

 
 

गुन्हा

पूर्वीची शिक्षा

आताची शिक्षा

वेगमर्यादा ओलांडणे

पाचशे रुपये

हजार रुपये दंड, तीन महिने तुरुंगवास, दुसऱ्यांदा गुन्हा केल्यास १० हजारांचा दंड आणि १वर्ष शिक्षा

क्षमतेपेक्षा जास्त भार वाहून नेणे

हजार रुपये दंड आणि पुढील प्रतिटनसाठी हजार रुपये

१० हजार रुपये दंड, सहा महिने शिक्षा, दुसऱ्यांदा गुन्हा केल्यास १५ हजार दंड, दोन वर्षे शिक्षा

मद्यपान करून वाहन चालवल्यास

हजार रुपये दंड आणि सहा महिन्यांची शिक्षा दुसऱ्यांदा गुन्हा केल्यास ३ हजार रुपये दंड आणि दोन वर्षांची शिक्षा

१० हजारांचा दंड, सहा महिन्यांची शिक्षा, दुसऱ्यांदा गुन्हा केल्यास १० हजार दंड आणि सहा महिन्यांची शिक्षा, दुसऱ्यांदा गुन्हा केल्यास १५ हजारांचा दंड आणि दोन वर्षांची शिक्षा

सिग्नल तोडल्यावर, वाहन चालवताना फोनवर संभाषण केल्यास

१ हजार रुपये दंड, सहा महिन्यांचा दंड, दुसऱ्यांदा नियम मोडल्यास २ हजारांचा दंड व दोन वर्षांची शिक्षा

५ हजार रुपये दंड, सहा ते १२ महिन्यांची शिक्षा, दुसऱ्यांदा नियम मोडल्यास १० हजारांचा दंड व दोन वर्षे शिक्षा