उत्तराखंडमध्ये दुहेरी संकट ; मदतकार्यासाठी गेलेले हेलिकॉफ्टर कोसळले

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Aug-2019
Total Views |


उत्तराखंडमध्ये पुरग्रस्तांच्या मदतकार्यासाठी गेलेले हेलिकॉफ्टर कोसळून ३ जणांचा मृत्यू


उत्तराखंड : उत्तराखंडमध्ये पुरग्रस्तांच्या मदतकार्यासाठी गेलेले हेलिकॉफ्टर कोसळले. या दुर्घटनेत पायलटसह ३ जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तराखंडमधील उत्तरकाशी भागातील मोलादी याठिकाणी हे हेलिकॉफ्टर कोसळले. बचावकार्यासाठी मदतीची सामग्री घेऊन जाताना, विजेच्या तारेत अडकून हे हेलिकॉफ्टर दुर्घटनाग्रस्त झाले. अपघातावेळी या हेलिकॉफ्टर मध्ये ३ जण होते या तिघांचाही या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे.

 

रविवारी उत्तरकाशीत ढगफुटीमुळे जनजीवन विस्कळीत झाले. भूसख्खलनामुळे अनेक ठिकाणी डोंगर कोसळले. यामुळे अनेक घरे मलब्याखाली दबली गेली आहेत. या घटनेने मोठी जीवित आणि वित्तहानी झाली आहे. आरकोटा, मोलाडी, मोल्डा, सनेल, टिकुची आणि व्दिचानू याठिकाणी लोक मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. यासाठी तीन हेलिकॉप्टर कार्यरत होते. हेलिकॉप्टरद्वारे पिण्याचे पाणी आणि खाण्याची पाकिटं पाठवण्याचे काम सुरू होते. मंगळवारपासून ही हेलिकॉप्टर सेवेत रुजू झाली होती.

 

आज सकाळी दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरने देहराडूनहून उत्तरकाशीमधील मोरी येथे मदत घेऊन जाण्यासाठी उड्डाण केले. मोरीहून मोलदीला जात असताना प्रवासात ते एका वीजेच्या तारेला धडकले आणि त्यानंतर ते तारेत अडकले. या नंतर ते खाली कोसळले.

@@AUTHORINFO_V1@@