योगी मंत्रिमंडळाचा विस्तार ; २३ मंत्र्यांनी घेतली शपथ

21 Aug 2019 15:09:34

 

 
लखनौ : उत्तर प्रदेशमधील योगी सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार सोहळा लखनऊच्या राजभवनमध्ये पार पडला. १९ मार्च २०१७ मध्ये योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. तब्बल २ वर्षांनी झालेल्या या मंत्रिमंडळ विस्तारात १८ नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली. स्वतंत्र प्रभार असणाऱ्या चार राज्यमंत्र्यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. ,पाच कॅबिनेट, सहा स्वतंत्र प्रभारी आणि 11 राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली.
 
 
 

 

महेंद्र सिंग, भूपेश राणा, अनिल राजभर, राम नरेश अग्निहोत्री यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. कपिलदेव अग्रवाल, सतीश चंद्र द्विवेदी , अशोक कटारिया, श्रीराम चौहान, रवींद्र जैस्वाल यांनी स्वतंत्र प्रभारी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली. २३ नवीन मंत्र्यांच्या समावेशानंतर योगी मंत्रिमंडळात मंत्र्यांची संख्या ५६ इतकी झाली आहे. आजच्या मंत्रिमंडळ विस्तारात जातीय आणि प्रादेशिक समतोलवर भर देण्यात आला. ब्राम्हण, क्षत्रिय या जातींबरोबरच दलित व मागास जातीतल्या नेतृत्वालादेखील मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0