सॅमसंग गॅलेक्सी 'नोट १०' आणि 'नोट प्लस' भारतात लॉन्च

    दिनांक  20-Aug-2019 17:05:09सॅमसंगने भारतात गॅलेक्सी नोट १० (Galaxy note 10) आणि गॅलेक्सी नोट १० प्लस (Galaxy 10 PLUS) लॉन्च केला. यापूर्वी जागतिक बाजारपेठेत हा फोन उपलब्ध होता. भारतात याची किंमत कीती, असेल याबद्दल साऱ्यांना उत्सूकता होती. बेंगळुरू येथील ओपेरा हाऊस येथे हे दोन्ही फोन लॉन्च करण्यात आले. 

 
 

गॅलेक्सी नोट १० ची किंमत ६९ हजार ९९९ इतकी आहे. तर गॅलेक्सी नोट प्लसची किंमत ७९ हजार ९९९ रुपयांना उपलब्ध आहे. दोन्ही फोनच्या आकारमानात फरक आहे. गॅलेक्सी नोट १० मध्ये ६.३ इंच टच स्क्रीन आहे. तर गॅलेक्सी नोट प्लसमध्ये ६.८ इंचीची स्क्रीन एचडी प्लस डिस्प्लेसह उपलब्ध आहे.

 


 

Samsung DeX या मोडद्वारे तुम्ही नोट 10 प्लससोबत मिळालेल्या केबलद्वारे तुम्ही लॅपटॉप किंवा मॉनिटर कनेक्ट करू शकता. या फिचरमुळे डाटा ट्रान्फरविना तुम्ही फोनमधील फाईल्स वापरू शकता. गॅलेक्सी नोट 10 चे वजन १६८ ग्रॅम इतके आहे.

  
गॅलेक्सी नोट 10मध्ये वापरण्यात आलेले एस पेन नोट 9च्या तुलनेत बारीक आणि लहान आहे. या पेनद्वारे झुम इन झुम आऊट केले जाऊ शकते. फ्रंट कॅमेरा आणि रिअर कॅमेराही मुव्ह केला जाऊ शकतो. फिल्टर बदलण्यासाठीही याचा वापर केला जाऊ शकतो. एस पेनद्वारे पावर पॉईंट प्रेझेंटेशनही दिले जाऊ शकते. त्याद्वारे टाईपिंग स्टाईलही बदलता येणे शक्य आहे.

 

गॅलेक्सी नोट 10 प्लसमध्ये १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज क्षमता आहे. गॅलेक्सी नोट १० मध्ये १० जीबी रॅम आणि ५१२ जीबी स्टोरेज आहे. नोट प्लसची मेमरी कार्डद्वारे ही क्षमता १ टीबीपर्यंत वाढवली जाऊ शकते. गॅलेक्सी नोट १० मध्ये मायक्रो मेमरी कार्डचा स्लॉट उपलब्ध नाही.
 

या फोनसोबत २५ वॉटचा दिलेला चार्जर हा ६५ मिनिटांत ४३०० एमएएच क्षमतेची बॅटरी ६५ मिनिटांत संपूर्ण चार्ज करू शकतो. हा फोन Aura Glow, Aura red आणि Aura Black या रंगात उपलब्ध आहे. प्री-बुकींग करणाऱ्या ग्राहकांना कंपनीकडून १९९९० रुपये किंमतीचे एक्टीव्ह वॉच ९ हजार ९९९ रुपयांमध्ये मिळणार आहे. रिटेल स्टोर्समध्ये बुकींग केल्यावर ६ हजार रुपये कॅशबॅग मिळणार आहे. रिअर कॅमेरा १२ मेगापिक्सल (वाईड अॅंगल), १६ मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अॅंगल, १२ मेगापिक्सल टेलीफोटो, फ्रंट कॅमेरा १० मेगापिक्सल, व्हिडिओ 4k Qualcomm Snapdragon 855 प्रोसेसर, फिंगर प्रिंट सेंन्सर उपलब्ध आहे.