ट्रिपल तलाकच्या विरोधात भारतातील पहिली केस मुंब्र्यात

    दिनांक  02-Aug-2019 18:36:18


 


ठाणे : ट्रिपल तलाक संदर्भातील विधेयक राज्‍यसभेत पारित होताच आता गेल्‍या अनेक वर्षांपासुन मुस्‍कटदाबी सहन करीत असलेल्‍या मुस्‍लीम महिलांना आपल्‍या हक्‍काचे आयुध हाती आल्‍यासारखे झाले आहे. विधेयक पारित होऊन एक दिवसाचा कालावधी उलटत असताना कौसा मुंब्रा येथील एका उच्छशिक्षिक महिलेने मुस्लिम महिला विवाह संरक्षण कायदाच्या अंतर्गत आपल्या पती इम्तियाज गुलाम पटेल विरोधात गुन्हा दाखल केला. तिच्या पतीने वॉट्सअप वर ३ वेळा तलाक तलाक तलाक म्हणून तिला गेल्यावर्षी घटस्फोट दिला, त्यामुळे महिलेने केला गुन्हा दाखल.

 

एमबीएपर्यंत शिक्षण झालेल्‍या या महिलेला तिच्‍या पतीने गेल्‍यावर्षी व्‍हाटसअपवर तीन वेळा तलाक लिहिलेला संदेश पाठवुन तलाक दिला होता. या तलाक नंतर पतीने दुसऱ्या महिलेशी विवाह केला होता. या महिलेने पतीवर मुस्लिम महिला विवाह संरक्षण कायदा कलम ४ सोबत, ४९८ अ, ४०६, ३४ हे गुन्हे केले. याचसोबत हुंडा आणि छळ होत असल्याची देखील तक्रार सदर महिलेने केली आहे. तक्रारदार महिला एमबीए झालेली असून, तिला ६ महिन्यांचा मुलगा आहे. तिने पतीसोबत सासू आणि नणंद यांच्यावर देखील केली तक्रार. पतीचे नाव, इम्तियाज गुलाम पटेल असून तो ३५ वर्षाचा आहे.