११ वर्षानंतर दिया मिर्झाचा हा निर्णय

02 Aug 2019 12:42:10


 

चित्रपट सृष्टीत गेल्या काही वर्षात आपण अनेक जोडप्यांच्या विभक्त होण्याविषयीच्या चर्चा केल्या आता या चर्चेमध्ये आणखी एका अभिनेत्रीचे नाव जोडले गेले आहे. सध्या तिच्या समाजकार्यासाठी ती चर्चेत होती पण नुकतेच तिने घेतलेल्या विभक्त होण्याच्या निर्णयामुळे सोशल मीडियावर त्याची चर्चा आहे. गेली ११ वर्ष सुरु असलेल्या संसाराला पूर्णविराम देण्याचा निर्णय तिचा पती साहिल संघा यांनी परस्पर सामंजस्याने घेतला असल्याचे दियाने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

दिया आणि साहिल यांनी आपले एक प्रोडक्शन हाऊस देखील सुरु केले होते. त्या अंतर्गत त्यांनी दोन चित्रपटांची निर्मिती देखील केली. दिया ने तिच्या पोस्टमध्ये लिहिल्यावर त्यांच्यातील मैत्री टिकून राहिली तर या पुढे देखील त्यांच्या प्रोडक्शन हाऊसकडून चित्रपटांची निर्मिती केली जाईल. दरम्यान त्यांच्या या निर्णयाला आणि त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी आदर बाळगून तिच्या चाहत्यांनी या विषयाकडे पाहावे असे आवाहन देखील तिने यावेळी केले आहे.

 

गेल्या वर्षभरातील विभक्त झालेले हे बॉलिवूडमधील साधारण चौथे-पाचवे प्रकरण. याआधी काही महिन्यांपासून अरबाज आणि मलायका यांच्या घटस्फोटाविषयी बॉलिवूडमध्ये प्रचंड चर्चा होती.

Powered By Sangraha 9.0