गुगलवर भिकारी सर्च केल्यावर दिसतोय 'हा' फोटो

    दिनांक  19-Aug-2019 15:35:34
 


नवी दिल्ली : 'गुगल' सर्च इंजिनवर सध्या 'भिकारी' शब्द टाइप करताच पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांचा फोटो दिसत आहे. त्यांच्या या फोटोला मॉर्फ करण्यात आले असून इमरान खान हे दाढी वाढलेल्या अवस्थेत भिकाऱ्याच्या वेशात हातात वाडगा घेऊन आहेत. कलम ३७० रद्द केल्यानंतर पाकिस्तानच्या बाजूने संघर्ष होताना वारंवार दिसत आहे. भारताकडूनही त्याला चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे. दरम्यान, आता इंटरनेटवर अशा प्रकारे फोटो दिसत असल्याने भारतीय नेटीझन्सनी पाकिस्तानला ट्रोल केले आहे.
 

 

इमरान खान सध्या सोशल मीडियावर यामुळे चांगलेच ट्रोल झाले आहेत. पाकिस्तानची आर्थिक स्थिती कोलमडली आहे. तेथे टोमॅटोपासून सोन्यापर्यंत सर्वच गोष्टींचे भाव गगनाला भिडले आहेत. इमरान खान यांनी यातून मार्ग काढण्यासाठी अनेक देशांकडे आर्थिक मदतही मागितली आहे. त्यामुळे त्यांचे छायाचित्र मॉर्फ केल्याचे दिसत आहे. पाकिस्तानी नेटीझन्सने यासाठी भारताला जबाबदार म्हटले आहे.

 

 गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी हा खोडसाळपणा केल्याचे पाकिस्तानी नेटीझन्सचे म्हणणे आहे. भारताने जम्मू आणि काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम ३७० हटविल्यानंतर पाकिस्तान सैरभैर झाले आहे. इमरान खान यांनीही भारतासोबतचे व्यापारी संबंध तोडले आहेत. परिणामी, पाकिस्तानमधील अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला असून तेथे महागाई वाढली आहे. या पार्श्वभूमीवर खान यांना नेटिझन्स ट्रोल करत आहेत.