तीन भारतीयांनी केले तिनशे पाकिस्तान्यांचे तोंड बंद !

    दिनांक  19-Aug-2019 12:22:21भाजपच्या शाझिया इल्मी आणि रा.स्व.संघाचे स्वयंसेवक थेट भिडले

 

सेओल : 'कलम ३७०' आणि 'कलम ३५ ' हटवल्यानंतर तीळपापड झालेल्या पाकिस्तान्यांच्या कुरापती सुरूच आहेत. जगभरात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांनी ठिकठिकाणी निदर्शने करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, अशीच एक घटना दक्षिण कोरियामध्ये घडली आहे. शेकडो पाकिस्तानी नागरिकांनी रस्त्यावर येत पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात घोषणाबाजी केली. मात्र, या तिनशे निदर्शकांवर भाजप नेत्या एकट्या भारी पडल्या. त्यांच्यासोबत अन्य दोन रा.स्व.संघाचे स्वयंसेवकांनीही पाकिस्तानी निदर्शकांचा विरोध केला. 

खुद्द शाझिया यांनी याबद्दलचा व्हिडिओ शेअर करत ही माहिती दिली आहे. शुक्रवार, दि. १६ ऑगस्ट रोजी शाझिया झल्मी आणि रा.स्व.संघाचे स्वयंसेवक भारतीय दुतावासात गेले होते. या ठिकाणाहून काही दूर अंतरावर भारताविरोधात घोषणाबाजी सुरू असल्याचे त्यांच्या लक्षात आले. शाझिया इल्मी यांनी निदर्शकांशी बोलण्याचा व त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, निदर्शकांनी त्यांचे म्हणणे ऐकून न घेता पुन्हा एकदा घोषणाबाजी सुरू केली.

 

या प्रकारावर संतापलेल्या शाझिया यांनी तिनशे निदर्शकांसमोर 'पाकिस्तान मुर्दाबाद, हिंदूस्थान जिंदाबाद'च्या घोषणा दिल्या. यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करून निदर्शकांना पांगवले व परिस्थिती आटोक्यात आणली. दरम्यान, भारतीयांकडून शाझिया यांच्या हिंमतीबद्दल कौतूक केले जात आहे. एक वाघीण तिनशे जणांवर भारी पडली, अशा भावना भारतीयांनी व्यक्त केल्या आहेत.