भाजपचा 'पंच' : महाराष्ट्र भाजपच्या उपाध्यक्षपदी पाच नव्या नेत्यांची नियुक्ती

19 Aug 2019 21:17:26



मुंबई : महाराष्ट्र भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी संघटनात्मक बदल केले. महाराष्ट्र भाजपच्या उपाध्यक्षपदी मुंबईतील माजी खासदार किरीट सोमय्या, माजी केंद्रीय मंत्री डॉ. सुभाष भामरे, प्रवीण पोटे-पाटील, योगेश गोगावले आणि अशोक कांडलकर यांची नियुक्ती केली आहे.

 

ओबीसी मोर्चाच्या अध्यक्षपदी विकास रासकर तर उपाध्यक्षपदी भूषणसिंह होळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे शहराध्यक्षपदाची जबाबदारी माधुरी मिसाळ यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. जालनाच्या जिल्हाध्यक्षपदी आमदार संतोष दानवे, नाशिक शहराध्यक्षपदी गिरीश पालवे, यवतमाळ जिल्हाध्यक्षपदी नितीन भुतडा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 

भाजपच्या मुख्य प्रवक्तेपदी माधव भांडारी तर सहमुख्य प्रवक्ता म्हणून केशव उपाध्ये यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मधू चव्हाण, गिरीश व्यास, गणेश हाके, शिरिष बोराळकर, विश्वास पाठक, अतुल शाह, अर्चना डेहणकर, शिवराय कुलकर्णी, भालचंद्र शिरसाठ, श्वेता शालिनी, इजाज देशमुख, सुनील नेरळकर या सर्वांची प्रवक्ते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना चंद्रकांतदादा पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. तर इतर जबाबदाऱ्यांमुळे काही नेत्यांना त्यांच्या आधीच्या पदांवरून मुक्त करण्यात आले आहे.

Powered By Sangraha 9.0