'काम करा अन्यथा नागरिकांना सांगून धुलाई करू' : नितीन गडकरी

18 Aug 2019 17:28:52


 

नागपूर: आठ दिवसात समस्या सोडवा अन्यथा लोकांना कायदा हातात घेऊन तुमची धुलाई करण्यास सांगेल असा इशारा आपण परिवहन विभागाच्या बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. तसेच आपण लालफितीच्या कारभाराच्या विरोधात असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
 

 एमएसएमई सेक्टरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेल्या लघु उद्योग भारतीच्या कार्यक्रमाला गडकरी उपस्थित होते. यावेळी आपण अधिकाऱ्यांनी काम न केल्यास त्यांची लोकांना सांगून धुलाई करु अशी तंबी दिल्याचे सांगितले.लालफितीच्या कारभाराविषयी नाराजी व्यक्त करताना गडकरी म्हणाले, आपल्याकडे लालफितीचा कारभार आहे. अनेक परिवहन निरीक्षक लाच घेतात. मी त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही सरकारी नोकर आहात. मी लोकांमधून निवडून आलो आहे. मी लोकांना उत्तर देण्यास बांधील आहे. जर तुम्ही चोरी करत असाल तर मी तुम्हाला एक चोर म्हणेल. तसेच या अधिवेशनात सहभागी झालेल्या उद्याेजकांना कोणतीही भीती मनात न बाळगता व्यवसाय करा अधिकारी तुम्हाला त्रास देऊ शकणार नाहीत असेही त्यांनी सागितले.

Powered By Sangraha 9.0