राष्ट्रपती रामनाथ कोविंद दोन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर

17 Aug 2019 11:30:25



नागपूर : राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज १७ आणि १८ ऑगस्ट रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. आज सकाळी १० वाजता कोविंद यांचे भारतीय वायूदलाच्या विशेष विमानाने नागपूर विमानतळावर आगमन झाले. राज्यपाल चे विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रपती यांचे स्वागत केले. यावेळी महापौर नंदा जिचकार, एअर मार्शल आरकेएस सक्सेना, राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल, विभागीय आयुक्त डॉ.संजीव कुमार, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल उपस्थित होते.

 

वर्ध्याच्या सेवाग्राम येथील महात्मा गांधी वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाला राष्ट्रपती संबोधित करणार असल्याने स्वागतानंतर त्यांचे भारतीय वायुदलाच्या विशेष हेलिकॉप्टरने वर्धा येथील कार्यक्रमासाठी प्रयाण झाले. संबोधानंतर ते गांधी सेवाग्राम आश्रमातील बापू कुटीला देखील भेट देतील. त्यानंतर आजच ते मुंबईत राजभवन येथे विविध पुनर्निर्माण प्रकल्पांचे उद्‌घाटन करतील. तर १८ ऑगस्ट रोजी नवी दिल्लीला परतण्यापूर्वी राष्ट्रपती राजभवनातील बंकरमधील संग्रहालयाचे उद्‌घाटन करतील.

Powered By Sangraha 9.0