'सुवर्णकन्या' द्युती चंदची पुन्हा 'सुवर्ण' कामगिरी

    दिनांक  17-Aug-2019 17:33:22नवी दिल्ली : भारताची धावपटू द्युती चंद हिने पाचव्या इंडियन ग्रां. प्री. स्पर्धेत १०० मीटरच्या शर्यतीत सुवर्णपदक पटकावले. तिने मिळवलेल्या या यशाचे केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांनी ट्विट करुन तिचे अभिनंदन केले. द्युती हिने शुक्रवारी झालेली १०० मीटरची शर्यत ११.४२ सेंकदामध्ये पूर्ण केली. यापूर्वी द्युतीने वर्ल्ड यूनिवर्सिटी स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकले होते.

 

वर्ल्ड यूनिवर्सिटी स्पर्धा जिंकणारी द्युती भारताची पहिली महिला ठरली होती. या स्पर्धेत तामिळनाडूच्या अर्चना सुरीनतरन हिने ११.५३ सेंकदामध्ये शर्यत पूर्ण करत रौप्य पदक जिंकले तर पंजाबची मानवीर कौर हिने १२.२८ सेकंदात कास्य पदकावर नाव कोरले. दरम्यान, द्युती चंद कायम विविध कारणांमुळे चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी तिने आशियाई अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत दमदार कामगिरी करत वाहवा मिळवली.