मिसेस मुख्यमंत्री बनल्या 'विश्वशांतीदूत'

16 Aug 2019 14:54:51

 

मुंबई: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना 'विश्वशांतीदूत' नामांकन जाहीर करण्यात आले आहे. विश्वशांतीरक्षक आंदोलनाचे संस्थापक डॉ. ह्यूज यांच्या हस्ते अमृता फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला. अमृता फडणवीस या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी असल्या तरी सामाजिक कार्यकर्त्या अशी त्यांची स्वतःची ओळख आहे. अमृता यांच्याबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही हे नामांकन मिळाले आहे.
 
 

आजवर अमृता फडणवीस यांनी अनेक सामाजिक कार्यात आपला सक्रिय सहभाग नोंदवला आहे. ग्रामीण भागातील जलसंधारणासाठीदेखील त्यांनी मोठा हातभार लावला आहे. तसेच मानवतेची सेवा, जपवणूक आणि शांतता ही मूल्ये प्रस्थापित केल्याबद्दल फडणवीस दाम्पत्याला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. विश्वशांती रक्षक आंदोलन ही एक सोशल मीडियावरील चळवळ आहे. यात जगभरातील २ लाखांहून अधिक लोक जोडले गेले आहेत. हे आंदोलन क्षमाशीलता, कृतज्ञता, प्रेमभाव, विनम्रता, दातृत्व, धैर्यशीलता आणि सत्य या सात शांतिमूल्यावर कार्य करते. माणुसकीच्या भावनेने शांतता प्रस्थापित करणे या विचारधारेवर हे आंदोलन कार्य करते.

Powered By Sangraha 9.0