श्रावणातल्या पूजा करू लखलखीत आणि मंगलमय !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Aug-2019
Total Views |

मंत्रोच्चाराचा, स्तोत्रपठणाचा धीरगंभीर आवाज, घंटेची किणकिण मनमोहक, विविध रंगांची फुलं, शांतपणे तेवणारा दिवा आणि त्या प्रकाशात लख्ख चमकणारी, लक्ष वेधून घेणारी तांब्या-पितळेची, चांदीची पूजा सामुग्री.... देवपूजा हा असा एक प्रसन्न, मंगल अनुभव असतो. मग ती दररोजची घरोघरी होणारी पूजा असो की सणांच्या निमित्ताने होणारी विशेष पूजा. आपल्याकडे असे सण भरपूर असतात. श्रावण हा तर उत्सवांचा राजाच.

 

पूजेत मनातला भाव महत्त्वाचा असतोच, पण त्या भावजागृतीकरिता साधनशुचिता अर्थात पूजेसाठी वापरल्या जाणाऱ्या साधनसामग्रीची स्वच्छतादेखील तितकीच महत्त्वाची असते. विविधरंगी फुलं जशी मन प्रसन्न करतात तशीच पूजेची तांब्या-पितळेची, चांदीची पूजासामुग्री चमकवलेली असेल तर पूजेची प्रसन्नता दुप्पट होते.

 

श्रावण हा पावसाळ्यात येत असल्याने हवेत आर्द्रतेचे प्रमाण ७० टक्के असते. त्यामुळे हवेत सतत ओलावा असल्याने तांब्या-पितळेच्या भांड्यांवर हिरवट थर जमा होऊन ती निस्तेज दिसू लागतात आणि चांदीची भांडी काळवंडलेली दिसतात. यामागचं शास्त्रीय कारण असं आहे की, हवेतल्या दमटपणामुळे रासायनिक अभिक्रिया होऊन तांब्याच्या पृष्ठभागावर कॉपर ऑक्साईडचा थर जमा होतो. पितळ हा तांबे आणि जस्त यांच्या मिश्रणातून तयार होणारा मिश्रधातू असल्याने त्यावर कॉपर ऑक्साईड आणि झिंक ऑक्साईडचा थर जमा होऊन हिरवट रंग दिसतो. त्याचप्रमाणे चांदीवर हायड्रोजन सल्फाइडमुळे रासायनिक अभिक्रिया होऊन काळसर थर जमा होतो. हा थर रासायनिक अभिक्रियेचा असल्याने इतर भांडी घासण्याच्या साबणाने तो दूर होत नाही. चांदी साफ करण्यासाठी सराफाकडे अर्थात ज्वेलर्सकडे नेली जाते. पण तिथे अॅसिड बाथ देऊन सफाई होत असल्याने मौल्यवान चांदीची झीज होण्याची शक्यता असते.

 

तांब्या-पितळेला स्वच्छ आणि लख्ख करण्यासाठी पितांबरी शायनिंग पावडर गेल्या अनेक वर्षांपासून घरोघरी वापरली जाते. परंतु, आता पितांबरी चांदीलाही नव्यासारखी चमक देते. इतकंच नव्हे तर पितांबरी शायनिंग पावडरमुळे आता तांबे, पितळ, चांदी, अॅल्युमिनियम आणि लोखंड अशा पाच धातूंची भांडी नव्यासारखी लख्ख होतात. त्यात कोणताही रासायनिक घटक नसल्याने त्याचा हातांवर कोणताही परिणाम होत नाही. शिवाय पितांबरी शायनिंग पावडरमध्ये प्रसन्न सुगंधाचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे श्रावणातल्या पूजांसाठी तांब्या-पितळेची आणि चांदीची लख्ख पूजासामुग्री मनाला प्रसन्नता देते.

 

 
@@AUTHORINFO_V1@@