ट्विटरनेच बंद केले रॅपर हार्ड कौर हिचे खाते

15 Aug 2019 18:28:38

 
 
 
मुंबई : वादग्रस्त रॅपर पॉप स्टार हार्ड कौर हीच ट्विटर खाते ट्विटर कडूनच बंद करण्यात आले. हार्ड कौर हि कायमच तिच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असते. आताही तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याविषयी वादग्रस्त विधाने करणारा व्हिडिओ ट्विटरवर प्रसारित केला होता. एवढेच नाहीतर या व्हिडिओ मध्ये खलिस्तानी सहकाऱ्यांसोबत ती दिसून येते. यामध्ये हे सर्व खलिस्तानी चळवळींविषयी माहिती देताना दिसून येत होते. हा व्हिडिओ शेअर होताच ट्रेंडिंग झाला परंतु यांनतर ट्विटरनेच सुरक्षिततेच्या कारणावरून तिचे अकाउंट बंद केले. तिच्या हे लक्षात येताच तिने इंस्टाग्रामच्या माध्यमातून आपला हा व्हिडिओ पुन्हा प्रसारित केला.
 
 
यापूर्वीही हार्ड कौर हिने उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व सरसंघचालक मोहनजी भागवत यांच्याविषयी आक्षेपाहार्य पोस्ट केल्या होत्या. हार्ड कौरने हिंदी चित्रपटातील गाण्यांना आवाज दिला आहे. 'पटियाला हाऊस' या चित्रपटासाठी देखील तिने काम केले आहे.
Powered By Sangraha 9.0