जागतिक पातळीवर हवामान बदल विषयक संवादात भारत आघाडीवर

13 Aug 2019 16:23:18


 

केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर ब्राझीलच्या साओ पावलो येथे होणाऱ्या ब्रिक्स आणि बेसिकसंघटनांच्या मंत्रिस्तरीय परिषदांना हजर राहणार आहेत. बेसिकसंघटनेच्या सदस्यांमध्ये नव्याने यांत्रिकीकरण झालेल्या ब्राझील, दक्षिण आफ्रिका, भारत आणि चीन या चार देशांचा यात समावेश आहे.

 

"भारताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जागतिक स्तरावर पर्यावरणविषयक संवादात मोठी आघाडी घेतली आहे," असे प्रतिपादन जावडेकर यांनी केले. या परिषदेसाठी रवाना होण्यापूर्वी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. "ज्यावेळी मी पॅरिसला गेलो होतो, त्यावेळी बेसिकसंघटनेच्या अस्तित्वाविषयी अनेकांनी शंका व्यक्त केल्या होत्या. मात्र, ही संघटना केवळ टिकलीच नाही तर पर्यावरणविषयक चर्चेत एक महत्वाचा घटक बनली आहे. यावेळीही पॅरिस करारानंतरच्या स्थितीचा आम्ही बैठकीत आढावा घेणार आहोत. तसेच संयुक्त राष्ट्रांच्या चिली येथे होणाऱ्या पुढच्या अधिवेशनात काय भूमिका घ्यायची याचा निर्णयही या बैठकीत होईल."

"पॅरिस कराराच्या अटी आणि जबाबदाऱ्यांचे पालन विकसित राष्ट्रेदेखील करतील," अशी अपेक्षा जावडेकर यांनी व्यक्त केली.

Powered By Sangraha 9.0