भारतीय रेल्वे धावणार 'स्वदेशी' इंजिनावर

    दिनांक  13-Aug-2019 16:41:12

 

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच भारतीय बनावटीचे हायस्पीड इंजिन रुळावरून धावणार आहे. पश्चिम बंगालमधील चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स (सीएलडब्ल्यू) येथे भारतीय रेल्वेने हायस्पीड लोकोमोटिव्ह (रेल्वे इंजिन) तयार केले आहे. जे जास्तीत जास्त १८० किमी प्रतितास वेगाने धावू शकते, रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटरवरून सोमवारी ही माहिती दिली.
 
 
 
 
ट्विटमध्ये गोयल यांनी इंजिनाच्या चाचणीचा व्हिडिओ देखील अपलोड केला आहे. केंद्र सरकारच्या 'मेक इन इंडिया' उपक्रमाअंतर्गत हे नवीन लोकोमोटिव्ह रेल्वे इंजिन तयार करण्यात भारताला यश आले आहे. नुकतीच या इंजिनची यशस्वी चाचणी पार पडली. या हायस्पीड इंजिनमुळे लांब पल्ल्याचे अंतर सहज आणि लवकर कापता येणार आहे.