हृतिक आणि टायगर यांचे 'वॉर' २ ऑक्टोबरला रंगणार

    दिनांक  12-Aug-2019 14:25:50


 

'सुपर ३०; नंतर हृतिक रोशन आणखी एका चित्रपटातून प्रेक्षकांच्या समोर येण्यास सज्ज झाला आहे. त्याच्या आगामी चित्रपटात तो टायगर श्रॉफबरोबर पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना दिसेल. 'वॉर' या आगामी चित्रपटामध्ये त्यांच्यात रंगणारे युद्ध प्रेक्षकांना पाहायला मिळेल. आज या चित्रपटाचे नवीन पोस्टर प्रदर्शित झाले. हिंदीबरोबरच तामिळ पोस्टरदेखील आज प्रदर्शित करण्यात आले. 


सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित 'वॉर' या चित्रपटाच्या या पोस्टरमध्ये हृतिक आणि टायगर आमनेसामने उभे आहेत. त्यांच्या स्टायलिश गाड्यादेखील दिसत आहेत तर या पोस्टरमध्ये वाणी कपूरच्या भूमिकेची झलकदेखील प्रेक्षकांना पाहायला मिळेल. आता त्यांच्यातले हे 'वॉर' कशामुळे निर्माण झाले, हे हळूहळू उघड होईलच पण त्या आधी आजच्या या पोस्टरमुळे प्रेक्षकांची उत्सुकता नक्कीच वाढेल.

अब्बास टायरवाला यांनी चित्रपटातील संवाद लिहिले आहेत. त्याकडेदेखील प्रेक्षकांचे लक्ष असेलच. दरम्यान, काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीजर प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. त्यानंतर आज आलेल्या या पोस्टरमुळे प्रेक्षकांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.