'कुली नंबर १' चे मोशन पोस्टर प्रदर्शित

12 Aug 2019 12:35:51


वरुण धवन आणि सारा अली खान मुख्य भूमिकेत असलेला आगामी चित्रपट कुली नंबर १ च्या रिमेकचे मोशन पोस्टर त्याचबरोबर आणखी दोन पोस्टर आज प्रदर्शित झाली आहेत. डेव्हिड धवन दिग्दर्शित 'कुली नंबर १' आगामी वर्षात १ मे ला प्रदर्शित होणार आहे.

'कुली नंबर १' च्या रिमेकमध्ये १९९५ साली प्रदर्शित कुली नंबर १ मधील पूजा म्हणजेच करिष्मा कपूरच्या भूमिकेच्या जवळ जाणारी असेल तर वरुण धवन राजू म्हणजेच कुली नंबर १ ची भूमिका साकारण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे आता हे दोघे त्यांच्या भूमिका कशा पद्धतीने वठवतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. तसेच या चित्रपटात सारा अली खान चे वडील म्हणून परेश रावल यांची एंट्री होण्याची चर्चा देखील सध्या सुरु आहे मात्र त्याविषयी अजून अधिकृतरीत्या घोषणा करण्यात आलेली नाही.

दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वीच चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. विशू भगनानी, जॅकी भगनानी आणि दीपशिखा देशमुख यांनी चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी घेतली आहे. वरुण धवन चा येत्या काळात स्ट्रीट डान्सर हा चित्रपट देखील प्रदर्शित होणार आहे.

Powered By Sangraha 9.0