'कलम ३७०'च्या निर्णयावर थलायवाचे समर्थन

    दिनांक  11-Aug-2019 18:53:31
 


मोदी आणि अमित शाह यांना श्रीकृष्ण आणि अर्जूनाची उपाधी
नवी दिल्ली : अभिनेता रजनिकांत याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना श्रीकृष्ण आणि अर्जूनाची उपाधी देत काश्मिरमध्ये कलम ३७० हटवल्याबद्दल कौतूक केले आहे. चेन्नई येथे उपराष्ट्रपती व्यैकय्या नायडू यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमावेळी ते बोलत होते. 

रजनिकांत म्हणाला, "मोदी आणि अमित शाह हे श्रीकृष्ण आणि अर्जूनाप्रमाणे आहेत. त्यांच्यापैकी श्रीकृष्ण कोण आणि अर्जून कोण याबद्दल तेच सांगू शकतील. मात्र, त्यांच्या कार्याबद्द्ल मी शुभेच्छा देऊ इच्छितो." अमित शाह यांना मिशन काश्मिर पूर्ण झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या.

 

"ज्या प्रकारे अमित शाह यांनी हे काम पूर्ण करून दाखवले त्याबद्दल त्यांचे कौतूक आहे. विशेषतः अमित शाह यांनी संसदेत ज्या प्रकारे भाषण दिले, ते शानदार होते. या निर्णयामुळे मी आनंदीत आहे." सुपरस्टार अभिनेते रजनिकांत हे बऱ्याचदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाची प्रशंसा करतात. मात्र, पहिल्यांदाच मोदींव्यतिरीक्त त्यांनी भाजपच्या अन्य नेत्याची प्रशंसा केली आहे.