'मर्दानी २' च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर...!

10 Aug 2019 12:06:28



गोपी पुथ्रण दिग्दर्शित 'मर्दानी २' च्या दिग्दर्शनाची तारीख आज जाहीर करण्यात आली. याआधी मर्दानी चित्रपटामधून राणी मुखर्जीने प्रेक्षकांवर आपल्या अभिनयाची छाप पाडलीच होती आता तीच जादू पुन्हा एकदा पसरवण्यासाठी 'मर्दानी २' मधून ती प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. आज जाहीर करण्यात आलेल्या तारखेनुसार मर्दानी २ हा चित्रपट यावर्षी १३ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 

चित्रपट समीक्षक तारण आदर्श यांनी आज याविषयी माहिती देणारे ट्विट केले असून यामध्ये त्यांनी या चित्रपटातील राणी मुखर्जीच्या भूमिकेचा एक फोटो देखील प्रेक्षकांसोबत शेअर केला आहे. मर्दानी आणि हीचकी असे दोन हिट चित्रपट केल्यानंतर पुन्हा एकदा आपल्या अभिनयाचे दर्शन प्रेक्षकांना देण्यासाठी राणी मुखर्जी आता सज्ज झाली आहे. या चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी आदित्य चोप्रा यांनी आपल्या खांद्यावर घेतली असून मर्दानी प्रमाणेच या चित्रपटाला देखील प्रेक्षकांचे तितकेच प्रेम मिळते का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Powered By Sangraha 9.0