या कंपन्या 'CCD' खरेदी करण्यास उत्सूक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Aug-2019
Total Views |



मुंबई : 'कॅफे कॉफी डे'चे संस्थापक आणि अध्यक्ष व्हि. जी. सिद्धार्थ यांच्या मृत्यूनंतर कंपनी विक्री करण्याची प्रक्रीया वेग घेत आहे. शीतपेय विक्री करणारी जगातील सर्वात मोठी कंपनी 'कोका-कोला'नेही यासाठी प्रस्ताव ठेवला आहे. या कंपनीसह टाटा ग्लोबल बेवरेजेस आणि जुबिलंट फूडवर्क्स या दोन कंपन्यांचीही नावे चर्चेत आहेत.

 

CCD खरेदी केल्यास दोन्ही कंपन्यांना फायदा

टाटा ग्लोबल बेवरेजचे अमेरिकन कॉफीचेन स्टारबक्सशी संयुक्त करार आहे. जर CCD ची खरेदी व्यवहार या कंपनीशी झाला तर स्टारबक्सच्या भारतातील विस्ताराला चालना मिळेल. मॅकडोनाल्ड (McDonald’s) आणि मॅकेफे (McCafe) यांचा कारभार पाहणारी वेस्टलाइफ डेव्हलपमेंट (Westlife Development) कंपनीची प्रतिस्पर्धी ज्युबिलंट फूडवर्कला (Jubilant Foodwork) टक्कर देण्याच्या विचारात आहे. ज्युबिलंट फूडवर्कने CCD विकत घेतल्यास कॉफी इंडस्ट्रीजमध्ये पाय रोवणे सहज शक्य होणार आहे.

 

CCD विकून ८ ते १० हजार कोटी जमा करण्याचे उद्दिष्ट्य

व्हि.जी. सिद्धार्थ यांनी 'कोका-कोला'ला CCD विकून ८ ते १० हजार कोटी जमा करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले होते. जूनमध्ये हा व्यवहार लवकरच होईल, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती. CCDवर एकूण ६ हजार ५४७ कोटी रुपयांचे कर्ज होते. त्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता.

 

'CCD'ला अन्य कंपन्यांची टक्कर

बाजारातील विश्लेषकांच्या मते, 'कॅफे कॉफी डे'ने बदलण्याची गरज आहे. कंपनीला बाजारातून चायोस (Chaios), चाय प्वाइंट (Chai Point) आदी कंपन्यांकडून तगडे आव्हान मिळत आहे. स्टारबक्स (Starbucks) बरिस्ता (Barista) और मॅककॅफे (McCafe) आदी ब्रॅंण्डचीही तगडी टक्कर आहे. २०१८मध्ये CCDची एकूण ९० छोटी दालने बंद केली होती. मार्च २०१९ मध्ये होणाऱ्या तिमाहीत ७६.९ कोटी इतकी विक्री नोंदवली होती. गतवर्षीच्या तुलनेत ही आकडेवारी ४६.६४ टक्क्यांनी जास्त आहे. कंपनीचा तोटा १६.५२ कोटीवरून वाढून २२.२८ कोटी इतका वाढला आहे.


@@AUTHORINFO_V1@@