मुस्लिम महिलांना न्याय मिळाला – उपराष्ट्रपती

01 Aug 2019 15:53:25



नवी दिल्ली : राज्यसभेत संमत झालेल्या मुस्लीम महिला (विवाह हक्क संरक्षण) विधेयक 2019 ची उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी प्रशंसा केली. स्त्री-पुरुष समानता साध्य करण्याबरोबरच महिलांना न्याय मिळवून देण्याचा यामागचा उपदेश असल्याचे ते म्हणाले. जानकी देवी स्मृती महाविद्यालयाच्या हिरक महोत्सवी कार्यक्रमात ते आज बोलत होते. ही महत्वाची सामाजिक सुधारणा असून यामुळे मुस्लीम महिलांना न्याय मिळवून दिला जाणार असल्याचे उपराष्ट्रपती म्हणाले.

 

महिला सबलीकरण हे आर्थिक विकास आणि सर्वंकष विकासाच्या दृष्टीनेही महत्वाचे आहे यावर त्यांनी भर दिला. दारिद्रय कमी करण्यासाठी आणि शाश्वत विकासाला प्रोत्साहन मिळण्यासाठी महिला शिक्षणाचा लक्षणीय परिणाम जाणवतो असेही त्यांनी नमूद केले. महिलांमधे ज्ञानवृद्धी आणि जागृती वाढवण्याचा समाजावर मोठा सकारात्मक प्रभाव दिसून येतो. पाच ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्था बनण्याचे आणि जगात आघाडीचे स्थान प्राप्त करण्याची आकांक्षा बाळगणाऱ्या भारतासारख्या देशात शिक्षण आणि महिला सबलीकरणाच्या महत्वाकडे दुर्लक्ष करता येणार नाही असेही ते म्हणाले.

Powered By Sangraha 9.0