अद्वितीय ; 'या' पठ्याने २८ चेंडूंमध्ये ठोकले शतक

    दिनांक  01-Aug-2019 16:28:21


 


नवी दिल्ली : युरोपमध्येही क्रिकेटचे वारे पसरले आहे. युरोपीय क्रिकेट लीग टी-१० च्या नावाने स्पर्धा आयोजित केल्या आहेत. या लीगमध्ये १०-१० षटकांचे सामने होत आहेत. रोमांचक होत असलेल्या या स्पर्धेत नवनवीन विक्रम पाहायला मिळत आहेत. स्पर्धेच्या एका सामन्यात एका खेळाडूने २८ चेंडूत शतक ठोकले आहे. अहमद नबी असे त्या खेळाडूचे नाव असून त्याने ही झंझावती खेळी केली आहे.

 

 
 

युरोपीय क्रिकेट लीग २०१९च्या सातव्या सामन्यात ड्रॅक्स क्रिकेट क्लबचा सलामीवीर अहमद नबीने क्लज क्रिकेट संघाविरुध्द खेळताना २८ चेंडूत खणखणीत शतक ठोकले. त्याने ही खेळी ५ चौकार आणि १४ षटकार ठोकत साकारली. नबीने सामन्यात दोन वेळा लगोपाठ ४-४ षटकार खेचले. ३० चेंडूत १०५ धावा करुन नबी बाद झाला.


 
 
 
अहमद नबीने केलेल्या धमाकेदार खेळीने ड्रॅक्स क्रिकेट क्बबने १० षटकात ६ गडी बाद १६४ धावा केल्या. याला प्रत्युत्तर देताना विरोधी संघ क्लज क्रिकेट क्लबला १० षटकात ५ गडी बाद ६९ धावा करता आल्या. ड्रॅक्स क्रिकेट क्लबने हा सामना ९५ धावांनी जिंकला.