संस्कृति संवर्धन प्रतिष्ठानच्या स्मरणिकेचे प्रकाशन

09 Jul 2019 22:06:25



मुंबई : संस्कृति संवर्धन प्रतिष्ठानच्या स्मरणिकेचे प्रकाशन दादरच्या ब्राह्मण सेवा मंडळाच्या सभागृहात नुकतेच करण्यात आले. सुप्रसिद्ध लेखक, चित्रपट निर्माते, अभिनेते आणि सामाजिक कार्यकर्ते युगराज जैन यांच्या हस्ते नुकतेच पार पडले.

 

या कार्यक्रमाला प्रतिष्ठानचे विश्वस्त मोहन सालेकर, प्रभा यादव, विहिंपचे कोकण प्रांत संगठनमंत्री अनिरुद्ध पंडित आदी मान्यवरही उपस्थित होते. भारताला पुन्हा एकदा विश्वगुरूपदी आरुढ करायचे असेल तर, मुलांना भारतीय संस्कृती व संस्कारांचे महत्त्व पटवून द्यावे लागेल. भारतीय मूल्यांची जोपासना करण्यासोबतच मुलांमध्ये नैतिकता रुजवावी लागणार असल्याचे प्रतिपादन सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते युगराज जैन यांनी केले.

 

यावेळी वैशाली सोहनी, अलका गोडबोले, उमा तेंडुलकर, अस्मिता आपटे, माधुरी खामकर, पुरुषोत्तम शेटे, विकास डोंगरे, कल्पना मिरवणकर आदी कार्यकर्त्यांना सन्मानचिन्ह आणि भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगीता कुरणकर यांनी केले. प्रकाश वाड यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, तर संयोजिका अस्मिता आपटे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. अस्मिता आपटे यांची आता प्रतिष्ठानच्या मुंबईच्या संयोजिका म्हणून निवड झालेली आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0