Ind vs nz Live : न्यूझीलंडला पहिला धक्का; बुमराहने घेतली गप्टिलची विकेट

    दिनांक  09-Jul-2019 

मँचेस्टर : उपांत्य सामन्याच्या चौथ्याच षटकांत न्यूझीलंडला पहिला धक्का बसला आहे. बुमराहने न्यूझीलंडच्या मार्टिन गप्टिलची विकेट घेतली. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. विश्वचषक २०१९ स्पर्धेमध्ये भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदानावर उपांत्य फेरीचा पहिला सामना होत आहे.

 

भारताकडून फलंदाजीत रोहित शर्मा, विराट कोहली, के. एल. राहुल यांनी जबरदस्त प्रदर्शन केले असून गोलंदाजीत जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी यांनी चांगली कामगिरी केली आहे. दुसरीकडे, न्यूझीलंड संघात कर्णधार केन विल्यम्सन यालाच स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करता आली असून अन्य फलंदाजांनी अपेक्षित कामगिरी बजावलेली नाही. मात्र गोलंदाजीत लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट इ. यांनी चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे भारताची फलंदाजी विरुद्ध न्यूझीलंडची गोलंदाजी, असे आजच्या सामन्याचे चित्र असणार आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat