रा.स्व.संघात युवा वर्गाचा प्रवेश लक्षणीय : अरुण कुमार

    दिनांक  09-Jul-2019
 


झाशी : रा. स्व. संघाच्या कार्यात नव्या पीढीचा प्रवेश सामावेश वेगाने होत आहे. संघाने बदलता प्रवाह लक्षात घेत सहा नव्या गतिविधींचा प्रारंभ केल्याची माहीती रा.स्व.संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख अरुण कुमार यांनी दिली. नव्या गतिविधींमध्ये पर्यावरण, ग्रामविकास, गो संरक्षण, सामाजिक सलोखा व कुटूंब प्रबोधन आदी कार्यांचा सामावेश करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. 

 

अरुण कुमार म्हणाले, गावातील सामूहीक शक्तीच्या प्रबोधनाची गरज आहे. समाजातील विविध त्रुटींना दूर करण्यासाठी या साऱ्याची गरज आहे. झासी येथील अम्बाबॉय स्थित एसआर महाविद्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहीती दिली. २०१० पासून संघाच्या कार्यात वृद्धी होत आहे. समाजातील विविध स्तरांतून संघ कार्याची स्वीकृती आणि अनुकूलता वाढत आहेत. २०१० मध्ये संघाच्या ४० हजार शाखा कार्यरत होत्या. २०१९ मध्ये त्यांची व्याप्ती वाढत हा आकडा ६० हजारांपर्यंत पोहोचला आहे. जनतेमध्ये संघ परिवाराला जाणून घेण्याची आणि त्यात सामाविष्ठ होण्याची उत्सूकता वाढत आहे. २०१२ ते २०१९ पर्यंत सहा लाख जणांनी ऑनलाईन स्वयंसेवक नोंदणीची इच्छा व्यक्त केली आहे. त्यापैकी एकूण दीड लाख लोकांनी नोंदणी केली आहे. तर गेल्या सहा महिन्यांमध्ये ६७ हजार लोकांनी संघ परिवारात येण्याची इच्छा व्यक्त केली आहे.”, असे ते म्हणाले.

 
 

रा.स्व.संघात सामाविष्ठ होणाऱ्या युवा वर्गाची संख्या वाढत असल्याचा उल्लेख त्यांनी केला. संपूर्ण देशभरात रा. स्व. संघाचे एकूण १ हजार प्रशिक्षण वर्ग सुरू असतात. त्यापैकी ७ दिवसांच्या प्रार्थमिक शिक्षावर्गात १ लाख २५ हजार स्वयंसेवकांचा सहभाग असतो. त्यामुळे समाजाच्या अपेक्षेनुसार, संघाच्या मदतीने तळागाळात पोहोचून हे कार्य अधिक दृढ करण्याची गरज असल्याचे मत कुमार यांनी व्यक्त केले.

 

पर्यावरणावर आलेल्या संकटांचा उल्लेख करत ते म्हणाले, जलसंरक्षण, वृक्षारोपण, प्लास्टीक प्रदुषण आदी क्षेत्रात संघाने कार्य करण्याचा निश्चय केला आहे. ग्रामीण विकास क्षेत्रात गोसेवा, गोसंरक्षण आदी क्षेत्रातही लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. रा.स्व. संघातर्फे कुटूंब प्रबोधनाचे कार्यही केले जाणार आहे., अशी माहीतीही त्यांनी यावेळी दिली.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat