'झिम्मा' चित्रपटाच्या चित्रीकरणाचा आज शुभारंभ

    दिनांक  09-Jul-2019
सिद्धार्थ
चांदेकर आणि सोनाली कुलकर्णी मुख्य भूमिकेत असलेल्या 'झिम्मा' या चित्रपटाच्या चित्रीकरणाला आजपासून सुरुवात होत आहे. सिद्धार्थ आणि सोनाली या दोघांनीही वेगवेगळ्या कलाकृतींमधून आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांवर पाडली आहे मात्र पहिल्यांदाच ते एकत्र 'झिम्मा' या त्यांच्या आगामी चित्रपटात झळकणार आहेत.


दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी या चित्रपटाचे पहिले पोस्टर आज सोशल मीडियावर पोस्ट केले. या चित्रपटात सोनाली कुलकर्णी आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्याबरोबरच सुहास जोशी, निर्मिती सावंत, क्षिती जोग, सायली संजीव आणि मृण्मयी गोडबोले यांच्या देखील महत्वाच्या भूमिका पाहायला मिळणार आहेत.


दरम्यान नुकतेच क्षिती जोग आणि हेमंत ढोमे यांनी त्यांच्या नवीन प्रोडक्शन कंपनीची देखील घोषणा केली आहे. त्यामुळे आता 'झिम्मा' या चित्रपटासह आणखी एक आनंदाची बातमी ते प्रेक्षकांसाठी घेऊन आले आहेत. 'झिम्माहा चित्रपट २०२० मध्ये प्रदर्शित होणार आहे.माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat