नितेश राणेंना चिखलफेक चांगलीच भोवली; १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

    दिनांक  09-Jul-2019

  

कणकवली - आमदार नितेश राणेंना चिखलफेक चांगलीच भोवली असून त्यांच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी ९ जुलैपर्यंत नितेश यांना पोलीस कोठडी देण्यात आली होती. मात्र, राणेंच्या जामीनावर मंगळवारी पुन्हा सुनावणी झाली, त्यानंतर त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.

 
 

आज नितेश राणेंसह त्यांच्या १८ कार्यकर्त्यांना कणकवली न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी न्यायालयाने आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे. त्यामुळे राणे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना २३ जुलैंपर्यंत तुरुंगात राहावे लागणार आहे. राणेंच्या वकिलांकडून नितेश राणेंना जामीन मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मुंबई-गोवा महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांना जबाबदार धरत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना नितेश राणेंनी चिखलाच्या ओतले होते. या प्रकारानंतर नितेश राणे आणि त्यांच्या ४० ते ५० समर्थकांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

 
 माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat