'मिशन मंगल' चित्रपटाचा औत्सुक्यपूर्ण टीजर प्रदर्शित

09 Jul 2019 14:26:32


एका
स्वप्नवत अशा जगात घेऊन जाणारा 'मिशन मंगल' या चित्रपटाचा टीजर आज प्रदर्शित झाला. अक्षय कुमार या चित्रपटात एका शास्त्रज्ञाची भूमिका साकारणार आहे. भारताच्या एका सुवर्ण कामगिरीवर आधारित 'मिशन मंगल' हा चित्रपट येत्या १५ ऑगस्ट ला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. तत्पूर्वी प्रेक्षशकांची उत्सुकता अधिकच वाढेल असा हा टीजर चित्रपटाचे सदारकर्ते फॉक्स स्टार हिंदी आणि अन्य कलाकारांनी सोशल मीडियावर आज पोस्ट केला.


भारताच्या मंगळवारच्या मोहिमेमध्ये अभूतपूर्व कामगिरी करणाऱ्या राकेश धवन यांच्या सत्यकथेवर आधारित जगन शक्ती दिग्दर्शित 'मिशन मंगल' या चित्रपटात सुप्रसिद्ध कलाकारांची मांदियाळी आहे. ज्यामध्ये अक्षय कुमार राकेश धवन यांच्या भूमिकेत, विद्या बालन - तारा शिंदे, तापसी पन्नू - कृतिका अगरवाल, सोनाक्षी सिन्हा - एका गांधी, शर्मन जोशी - परमेश्वर नायडू, कीर्ती कुल्हारी - नेहा सिद्दीकी, नित्या मेनन - वर्षा गोवडा, एच.आर. दत्तात्रय - अनंत अय्यर अशा भूमिकांमध्ये मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत.


भारताच्या मंगळ महिमेमधील अद्वितीय कामगिरीमधील आठवणींना या चित्रपटामुळे पुन्हा एकदा उजाळा मिळणार आहे. ही मोहीम पुढील कित्येक पिढ्यांना प्रेरणा देणारी ठरेल यात शंका नाही पण हा चित्रपट किती लोकांच्या मनावर आपली छाप पडण्यास यशस्वी ठरतो हे पाहणे आता महत्वाचे ठरेल.


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat


Powered By Sangraha 9.0