'सेक्रेड गेम्स' या नेटफ्लिक्सवरील प्रचंड लोकप्रिय झालेल्या मालिकेचा दुसरा सिझन येत्या १५ ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. या मालिकेचा ट्रेलर आज प्रदर्षित करण्यात आला. या मालिकेमधील काही विशेष भूमिकांनी प्रेक्षकांना अक्षरशः वेडे करून सोडले होते. त्यापैकीच नवाजुद्दीन सिद्दीकीची एक भूमिका म्हणजे गणेश गायतोंडे, या पार्श्वभूमीवर नवाझुद्दीन सिद्दीकी यांनी 'गायतोंडे इस बॅक" असे म्हणत सोशल मीडियावर दुसऱ्या सिझनची घोषणा केली. त्याचबरोअबर सरताज ची भूमिका साकारणाऱ्या सैफ आली खान ची देखील लोक वाट पाहत आहेत.
या नवीन मालिकेमध्ये काही नवीन ट्विस्ट आणि रहस्यमय गोष्टी प्रेक्षकांसमोर येणार आहेत. नवीन मालिकेतील रहस्यांमागचे नवीन चेहरे देखील पाहायला मिळणार आहेत. त्यापैकी पंकज त्रिपाठी आणि कल्की यांचा महत्वाचा भाग पाहायला मिळेल.
या मालिकेची असंख्य प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. आता लवकरच त्यांची ही प्रतीक्षा संपणार आहे. मात्र आता या प्रतिक्षेचे फळ कसे आहे हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat