हिमा दासची 'सुवर्ण' कामगिरी; चार दिवसात दोन सुवर्णपदके

    दिनांक  08-Jul-2019


 


नवी दिल्ली : भारतीय वेगवान धावपटू हिमा दास हिने नवा इतिहास रचला आहे. हिमा दासने पोलंड येथे सुरू असलेल्या कुट्नो एथलेटिक्स मीटमध्ये सुवर्णपदक पटकावले. एकाच आठवड्यातील हिमाचे हे दुसरे सुवर्णपदक ठरले आहे. कुट्नो एथलेटिक्स मीटमध्ये हिमाने २३.७७ सेंकदामध्ये २०० मीटर अंतर पार करत विजयी कामगिरी केली.


मागील आठवड्यातील पोन्जान एथलेटिक्स ग्रां प्री-२०१९ च्या २०० मीटर स्पर्धेमधेही हिमाने सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले होते. तर कुट्नो एथलेटिक्स मीटमध्ये पुरूष गटात मोहम्मद अनसनेही २१.१८ सेकंदामध्ये २०० मीटर अंतर पार करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. दरम्यान, हिमा व अनसच्या सुवर्णकामगिरीमुळे देशभरातून वर्षाव होत आहे.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat