मुलीच्या लग्नात खर्च टाळत राज्याला दिली पाच लाखांची मदत

    दिनांक  08-Jul-2019


 


राज्याचे माजी मुख्य सचिव तथा लोकपाल सदस्य दिनेश कुमार जैन यांचा कौतुकास्पद निर्णय

 

मुंबई : राज्याचे माजी मुख्य सचिव तथा लोकपाल सदस्य दिनेश कुमार जैन यांनी आपल्या मुलीच्या लग्नात अनावश्यक खर्च टाळत बचत झालेली पाच लाख रुपयांची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीला दिली. रविवारी नवी दिल्ली येथे झालेल्या विवाह समारंभात नवदाम्पत्याला आशीर्वाद देण्याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. त्यावेळी नवदाम्पत्य श्रेया आणि सबरीश यांच्या हस्ते पाच लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करण्यात आला.

 

ही रक्कम शेतकरी आत्महत्याग्रस्त भागातील विधवा महिलांच्या कल्याणासाठी वापरावी असे आवाहन वधू श्रेया जैन यांनी केले. तर प्रत्येकाने अशा प्रकारे विवाह सोहळ्यावरील अनावश्यक खर्चात बचत करीत सामाजिक दायित्व म्हणून मुख्यमंत्री निधीसाठी योगदान देण्याचे आवाहन दिनेश कुमार जैन यांनी केले.

 
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat