'हा' आहे फरक ! नितेश राणेंवर मार्मिक टीका

    दिनांक  08-Jul-2019
मुंबई : मुंबई-गोवा मार्गाच्या दुरवस्थेबद्दल अधिकाऱ्यांना जाब विचारताना अंगावर चिखल ओतून केलेल्या आंदोलनामुळे निलेश राणे पोलीस कोठडीत आहेत. निलेश राणे कोठडीत असल्यावर मार्मिक टोला लगावणारे पोस्टर्स सध्या युवासेनेतर्फे व्हायरल केले जात आहेत.

 

दरम्यान, एका फोटोत आदित्य ठाकरे हे एका स्वच्छता मोहीमेत सहभाग घेताना दिसत आहे. त्यात आदित्य यांच्या कपड्यांवर चिखल उडतानाचा फोटो आहे. त्याला कॅप्शनही जोडण्यात आली आहे. "चिखल इथेही आहे. चिखल तिथेही आहे, पण तो गजाआड आहे हा मनाआड आहे...!", अशी काव्यात्मक टीपण्णी या फोटोमध्ये केला आहे. सोबत नितेश राणे यांचा चिखल फेक केल्याचा व्हिडिओही शेअर केला आहे.
 

युवासेनेने थेट नितेश राणेंविरोधात बोलणे मात्र, टाळले आहे. त्यामुळे युवासेना कार्यकत्यांऐवजी अन्य अधिकृत अकाऊंटद्वारे हा फोटो शेअर करण्यात आलेला नाही. राणे आणि ठाकरे यांच्या नव्या पीढीचाही वाद बऱ्याचदा चव्हाट्यावर आला आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर अनेकदा असे वादाचे प्रसंग उद्भवले आहेत.

 

दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी गेल्या काही महिन्यांपासून वर्सोवा किनारा स्वच्छता मोहीमेत सहभाग घेतला होता. आदित्य ठाकरे तीन तास सफाई करत होते. रविवारीही त्यांनी या सफाई मोहीमेत सहभाग घेतला. किनाऱ्यावरील प्लास्टीक, थर्माकोल, पिशव्या उचलण्याचे काम त्यांनी केले आहे. 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat