राहुल गांधी यांनीच राजीनामा देण्याची परंपरा सुरु केली: राजनाथ सिंह

    दिनांक  08-Jul-2019

 

 
नवी दिल्ली : राजीनामा देण्याची परंपरा तर राहुल गांधींनीच सुरू केली आहे. मग जर अशावेळी काँग्रेसमधील कोणी राजीनामा देत असेल तर त्यासाठी भाजपाला जबाबदार ठरवणे चुकीचे आहे, अशा शब्दांत केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज लोकसभेत कर्नाटकमध्ये सुरु असलेल्या राजकीय घडामोडींबाबत बोलताना राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे.
 
 
 
 
 
 

कर्नाटकमधील आमदारांच्या राजीनामाच्या मुद्दा उपस्थित होताच राजनाथ सिंह यांनी याच्याशी भाजपचा काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले की, आमच्या पक्षाने कधीच घोडेबाजार केलेला नाही. आम्ही संसदीय लोकशाहीची पवित्रता कायम राखण्यासाठी कटीबद्ध आहोत. राजीनामे देण्याची परंपरा काँग्रेसमध्ये राहुल गांधी यांनीच सुरू केली आहे, आमच्याकडून याची सुरूवात झालेली नाही. त्यांनी स्वतःच कार्यकर्त्यांना राजीनामे देण्यास सांगितले, एवढेच नाहीतर काँग्रेसचे वरिष्ठ नेतेदेखील राजीनामे देत आहेत, असे राजनाथ सिंह म्हणाले.

 
 
 माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat