"कबीर सिंह" ठरला ब्लॉकबस्टर

08 Jul 2019 12:46:18

 



शाहिद कपूर आणि किआरा अडवाणी यांच्या 'कबीर सिंह' या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटांनी इतिहास घडवला. आत्तापर्यंत आपण २०० कोटींची कमाई केलेले भारत,दबंग, उरी असे अनेक चित्रपट पाहिले मात्र 'कबीर सिंह' ने या सगळ्यांना मागे सारत तब्बल २३५ कोटींची कमाई केली. याचे श्रेय अर्थातच शाहिद कपूर आणि किआरा अडवाणी यांच्या अभिनयाला जाते मात्र त्यापेक्षा जास्त चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांचा हा प्रयत्न सफल झाला असेच म्हणावे लागेल. 
 
 


'कबीर सिंह' चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात १३४.४२ कोटींची कमाई करत बॉक्स ऑफिसवर आपली पकड मजबूत केली. त्यानंतर दुसऱ्या आठवड्यात देखील चित्रपटाने प्रेक्षकांवर चांगला प्रभाव पाडत ७८.७८ कोटींची कमाई केली. मात्र तिसऱ्या आठवड्यातील कमाईमध्ये थोडीशी घसरण पाहायला मिळाली. तिसऱ्या आठवड्यात २२.५२ कोटी कमाई करत चित्रपटाने एकूण २३५.७२ कोटींचा गल्ला जमवला आणि एक नवीन विक्रम घडवला. या यशस्वी कमाई बरोबरच २०१९ मधील ही एक ब्लॉकबस्टर फिल्म ठरली आहे.

चित्रपट हा कोणा एकामुळे सफल होत नसतो तर त्यामागे कित्येक लोकांचे परिश्रम, सर्जनशीलता आणि इच्छाशक्ती याची जोड असते. आणि म्हणूनच हा चित्रपट यशस्वी होण्यामागे जितका पडद्यासमोरील कलाकारांचा सहभाग आहे तितकाच पडद्यामागे काम करणाऱ्या व्यक्तींचा.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
 
 
Powered By Sangraha 9.0