अमरनाथ यात्रा एका दिवसासाठी स्थगित

08 Jul 2019 12:44:44

 

 
श्रीनगर : अमरनाथ यात्रेकरूंच्या सुरेक्षाच्या कारणास्तव यात्रेला १ दिवसाची स्थगिती देण्यात आली आहे. दहशतवादी बुरहान वानी याच्या खात्म्याला तीन वर्ष पूर्ण होत असल्याने सोमवारी काश्मीर घाटीमध्ये बंदचे आवाहन करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर श्रीनगरमध्ये कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे १ दिवसासाठी यात्रेला स्थगिती देण्यात आली आहे.

 

१ जुलैपासून अमरनाथ यात्रा सुरु झाल्यापासून आतपर्यंत ९० हजारपेक्षा अधिक श्रद्धाळूंनी बाबा बर्फानीचे दर्शन घेतले आहे. ४५ दिवस चालणारी अमरनाथ यात्रा १५ ऑगस्टला श्रावण पूर्णिमेला पूर्ण होईल. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही अमरनाथ यात्रेवर अतिरेक्यांचा हल्ला होण्याची शक्यता असल्याने श्रीगनरमध्ये मोठा बंदोबस्त ठेवला आहे. तीन वर्षापूर्वी भारतीय सैन्याने दहशतवादी संघटनेचा कमांडर बुरहान वाणीचा खात्मा केला होता. त्याला ३ वर्षे होत असल्याने सोमवारी काश्मीर घाटीमध्ये बंदचे आव्हान करण्यात आले आहे. श्रीनगरमध्ये कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती पाहता श्रद्धाळूंना श्रीनगरमध्येच रोखण्यात आले असून पुढे जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

 
 
 
 माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat
 
Powered By Sangraha 9.0