रिक्षाचालकांचा नियोजित संप मागे

    दिनांक  08-Jul-2019
मुंबई : राज्यातील रिक्षाचालकांनी मंगळवार दि. ९ जुलै रोजी पुकारलेला बेमुदत संप सोमवारी रात्री मागे घेण्यात आला. महाराष्ट्रातील रिक्षाचालकांच्या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची दुपारी ३ वाजता बैठक आयोजित करण्यात आली आहे.

 

ऑटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृति समितीचे अध्यक्ष शशांक राव यांनी याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. "आम्हाला विश्वास आहे आम्हाला न्याय मिळेल. जनतेची होणारी गैरसोय टाळण्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाप्रमाणे मंगळवारी मध्यरात्रीपासून पुकारलेला नियोजित संप मागे घेतला आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat