विक्रम ! राज्यात पाच दिवसांत २ कोटी १७ लाख रोपांची लागवड

    दिनांक  07-Jul-2019सुमारे चार लाख नागरिकांचा सहभाग 

मुंबई : राज्यात १ जुलै २०१९ पासून ३३ कोटी वृक्षलागवडीस प्रारंभ झाला असून केवळ पाच दिवसात २ कोटी १७ लाख ८५ हजार ९६८ रोपे राज्यात लागली. या वृक्षलागवड कार्यक्रमात आतापर्यंत सुमारे ४ लाख नागरिक सहभागी झाले आहेत.

 

विभागनिहाय वृक्षलागवड

अमरावती विभागात आतापर्यंत १८ लाख ८६ हजार ३१०, औरंगाबाद विभागात ३१ लाख ७३ हजार ७९४, कोकण विभागात ४३ लाख ७४ हजार ८८०, नागपूर विभागात २८ लाख ८८ हजार १९४, नाशिक विभागात ३४ लाख ७५ हजार ७४७ आणि पुणे विभागात ५९ लाख ८७ हजार ०४३ वृक्षलागवड झाली आहे.
 

वन विभाग व इतरांकडून झालेली वृक्षलागवड

यात वन विभागाने १ कोटी २० लाख ८२ हजार ०३१, सामाजिक वनीकरण विभागाने ५६ लाख ५० हजार ९०१, वन विकास महामंडळाने ६ लाख ९२ हजार ४७१ रोपे लावली आहेत. ग्रामपंचायत क्षेत्रात आतापर्यंत १७ लाख २८ हजार ९८६ रोपे लागली आहेत. इतर विभागांनी मिळून १६ लाख ३१ हजार ५७९ वृक्षांची लागवड केली आहे. राज्यात १ जुलै ते ३० सप्टेंबर २०१९ या कालावधीत लोकसहभागातून ३३ कोटी वृक्षलागवड केली जाणार आहे. आज पाचव्या दिवशी त्याच्या ६.३१ टक्के वृक्षलागवड राज्यात झाली आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat