बर्थडे स्पेशल : धोनी व्यक्ती नव्हे तर संकटांचा महापूर बाजूला सारून पुढे जाणारी एक वृत्ती आहे

    दिनांक  07-Jul-2019   
२०११ मध्ये भारतीय क्रिकेट संघाने ज्या खेळाडूच्या नेतृत्वाखाली विश्वचषक चषकावर आपले नाव कोरले होते, त्या क्रिकेट जगतातील जादूगाराचा आज जन्मदिवस... महेंद्रसिंह धोनी. त्याच्या फॅन्सच्या मते, धोनी एखाद्या सर्वसाधारण खेळाडूकडूनही उत्तम कामगिरी करून घेऊ शकतो. लोखंडाचेही सोने करणारा परिस भारतीय क्रिकेटविश्वाला लाभला.


 

धोनी जेव्हा भारतीय संघात सामील झाला. त्यावेळी आपल्या धडाकेबाज फलंदाजीने चौकार-षटकार ठोकत कमी वेळात क्रिकेटप्रेमींच्या मनात घर केले. धोनीची शैली क्रिकेटपटूंपेक्षा थोडी वेगळी होती. त्याचा हेलिकॉप्टर शॉट जास्त गाजला. आजही अनेक खेळाडू त्यांच्या या शॉट्सची कॉपी करताना दिसतात.


 

अलिकडेच धोनीने निवृत्ती घ्यावी, अशी चर्चा अनेकांनी सुरू केली असताना धोनी आणि त्यांच्या फॅन्सनेही याला चोख प्रत्युत्तर दिले होते. "मी निवृत्त व्हावे, अशी अनेकांची इच्छा आहे. काहीजण श्रीलंका दौऱ्यापूर्वीच मला निवृत्ती घेण्यास सांगत होते. मला स्वतःला नाही माहीत."

 

दरम्यान, धोनीच्या फॅन्सतर्फेही अनेकदा टिकाकारांना लक्ष्य केले जाते. धोनीचे संघातील स्थान आणि महत्व अनेकदा त्याच्या फॅन्सकडूनच अधोरेखित केले जाते. धोनी निवृत्त झाल्यास एक चांगला यष्टीरक्षक, एक कुल कॅप्टन आणि धडाकेबाज फलंदाज आपण गमावू, अशा भावना चाहते व्यक्त करत असतात.


 

दिग्गजांकडूनही धोनीची पाठराखण

1. महेंद्र सिंह धोनी हा एक महान कर्णधार आहे. एकदिवसीय सामन्यातील त्यांची कारकीर्दीतील त्याचा विक्रम त्याची साक्ष देत आहे. - सौरव गांगुली2. आत्तापर्यंत ज्या कर्णधारांच्या नेतृत्वात मी खेळलो त्यात धोनी हा सर्वोत्तम आहे - सचिन तेंडूलकर


3. मी स्वतःला भाग्यशाली समजतो की, धोनीच्या नेतृत्त्वात मला खेळण्याची संधी मिळाली - मायकल हसी


4. मी धोनीसोबत खेळत असताना त्याच्या मैदानातील शैलीचा अभ्यास करत असतो - ड्वेन ब्रावो5. जर धोनी माझ्या संघात असेल तर मी युद्धाच्या मैदानातही जायला तयार आहे - गॅरी कर्स्टन6. मृत्यूपूर्वी मला पुन्हा एकदा धोनीने २०११ च्या विश्वचषकातील षटकार पाहायचा आहे - सुनील गावस्कर


 

7. धोनी माझा कर्णधार होता आणि कायम राहील - विराट कोहली
8. मी माझा क्रिकेट संघ निवडेन तेव्हा सचिन संघाचा ओपनर असेल आणि धोनी कर्णधार - स्टीव वॉ9. भारतीय संघाला दबावाच्या क्षणी षटकाराची आवश्यकता आहे, तर धोनीशिवाय पर्याय असूच शकत नाही - रमीज राजा

 

10. सर्वात शांत डोक्याने खेळणारा धोनी हा तेव्हा उत्तम कामगीरी करतो ज्यावेळी संघाला त्याची गरज असते. - माइकल वॉन

 

झारखंड येथील एका निमशहरी भागांतून इतक्या मोठ्या यशाला गवसणी घालणारा धोनी हा लाखो भारतीय आणि क्रिकेटप्रेमींची आशा आहे. संकटांना थोपवत आपल्या ध्येयाकडे शांत डोक्याने चालत राहणे, वेळप्रसंगी कटवट भूमिका घेत योग्य त्या शिखरावर पाय रोवून उभे राहणे अनेकांना धोनीनेच शिकवले आहे. त्याचे जितके फॅन्स आहेत, तसे त्याचा द्वेष करणारीही काही मंडळी आहेत. मात्र, त्यांनीही धोनी नावाच्या वादळाचे अस्तित्व कधीही अमान्य केले नाही. क्रिकेटविश्वात आव्हाने पेलणारी धोनी ही व्यक्ती नव्हे वृत्ती म्हणावी लागेल, अशा या वादळाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा...!

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat