लोकलखाली वृद्धाने मारली उडी; जवानाच्या सतर्कतेमुळे वाचले प्राण

    दिनांक  06-Jul-2019

 

 
मुंबई : पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल स्थानकामध्ये लोकलसमोर बसून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या वृद्धाचे प्राण आरपीएफ जवानांनी दाखववेल्या सतर्कतेमुळे वाचले. आरपीएफचे जवान मनोज आणि अशोक यांनी आपला जीव धोक्यात घालून या वृद्धाला रुळांवरून बाजूला केले.
 
 
 
 

मुंबई सेट्रल स्थानकात दुपारी आजोबा ट्रेनची वाट पाहत होते. ट्रेन येताच आजोबांनी फ्लॅटफॉर्मवर उतरुन रेल्वे रुळावर मांडी घालून बसले. आजोबा आत्महत्या करत असल्याचे पाहताच स्थानकावर असलेल्या प्रवाशांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. प्रवाशांचा हा आरडाओरड ऐकून घटनास्थळी आरपीएफ जवान मनोज आणि अशोक यांनी आपल्या जीवाची परवा न करता रुळावर उडी मारत आजोबांना बाजूला केले. प्रवाशांचा आरडाओरड ऐकल्यानंतर मोटरमने देखील प्रसंगावधान दाखवत गाडी मध्येच थांबवली. आजोबांना बाजूला केल्यानंतर ट्रेन निघून गेली आणि आजोबांचे प्राण वाचवण्यात जवानांना यश आले आहे. आजोबांच्या कुटुंबियांनी देखील आरपीएफच्या जवानांचे मनापासून आभार मानले आहेत. मात्र, या वृद्ध व्यक्तीने आत्महत्येचा प्रयत्न का केला, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

 
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat