भारत VS श्रीलंका : नाणेफेक जिंकून श्रीलंका ४ बाद ५५ धावांवर

06 Jul 2019 16:06:38



इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील ४४ वा सामना आणि भारताचा शेवटचा साखळी सामना आज श्रीलंकेसोबत खेळवला जात आहे. भारत आधीच विश्वचषकाच्या फलकावर दुसऱ्या क्रमांकावर आहे मात्र दोन्ही संघांसाठी हा सामना महत्वाचा ठरणार आहे. आजच्या सामन्याला सुरुवात झाली असून श्रीलंकेने नाणेफेक जिंकून फलंदाची करण्याचा निर्णय घेतला आहे. आजच्या सामन्यात शमी आणि चेहेल यांना खेळवण्यात येणार नसल्यामुळे भारताकडे गोलंदाजीकरिता ५ नावांचे पर्याय उपलब्ध आहेत.

सुरुवातीच्याच काही चेंडूंमध्ये श्रीलंकेचे दोन गाडी बाद करण्यात भारतीय संघाला यश आल्यामुळे संघामधील आत्मविश्वास वाढला आहे. सध्या श्रीलंका ४ बाद ५५ धावांवर खेळात आहे. सध्याच्या परिस्थितीनुसार हा सामना भारताच्या दिशेने झुकलेला दिसत आहे. त्यामुळे हा सामना कोणाच्या नावावर होतो हे पाहणे आज औत्सुक्याचे ठरणार आहे.

दरम्यान, काल झालेल्या सामन्यात पाकिस्ताननं बांग्लादेशाला ९४ धावांनी पराभूत केलं. मात्र या विजयानंतरही पाकिस्तान संघ उपांत्य फेरीतसाठी पात्र होऊ शकला नाही. विश्वचषक स्पर्धेतला दुसरा सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणार आहे. भारत यापूर्वीच उपांत्य फेरीत दाखल झाला आहे.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/आणि फॉलोकरा twitter.com/MTarunBharat

 
Powered By Sangraha 9.0