नीरव मोदीला डीआरटीचा दणका; पीएनबीला व्याजासहित ७३०० कोटी रुपये देण्याचे आदेश

    दिनांक  06-Jul-2019

 

 
पुणे : हिरे व्यापारी नीरव मोदी याला पुण्यातील कर्ज वसुली कोर्टाने (डीआरटी) मोठा दणका दिला आहे. पंजाब नॅशनल बँकेला व्याजासहित ७३०० कोटी रुपये व्याजासह परत करण्याचे आदेश कर्ज वसुली व्यायाधीकणाचे पीठासीन अधिकारी दीपक ठक्कर यांनी नीरव मोदीला दिला आहे. नीरव मोदी प्रकरणातील हा भारतातला पहिलाच निकाल आहे.
 

नीरव मोदी व त्याच्या कुटुंबीयांनी पंजाब नॅशनल बँकेच्या काही अधिकाऱ्यांशी संगनमत करून बनावट लेटर ऑफ क्रेडिटच्या माध्यमातून तब्बल १३ हजार कोटींचा गैरव्यवहार केला. त्यानंतर नीरव मोदी कुटुंबासह देशाबाहेर पळून गेला. त्यामुळे कर्जवसुलीसाठी बँकेने 'डीआरटी'कडे धाव घेतली. मात्र, मुंबईतील 'डीआरटी'मध्ये न्यायाधीशांचे पद रिक्त असल्याने हा दावा पुण्यातील 'डीआरटी'कडे (डीआरटी वन) वर्ग करण्यात आला. पीठासीन अधिकारी दीपक ठक्कर यांच्या समोर हा खटला सुरु आहे. बँकेने सात हजार कोटी रुपयांचा एक, तीनशे कोटी रुपयांचा एक आणि १७०० कोटी रुपयांचा एक असे तीन दावे दाखल केले आहेत. त्यापैकी दोन दाव्यांचा निकाल आज देण्यात आला असून कोर्टाने मोदीला हे आदेश दिले आहेत.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat