संघावरील आरोपाप्रकरणी सीताराम येचुरींनी घेतला जामीन; पाहा अशी केली जामिनावर सही

    दिनांक  04-Jul-2019 


मुंबई : संघावरील आरोपाप्रकरणी माकप नेते सीताराम येचुरी यांच्यासह काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींना शिवडी न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. गौरी लंकेश यांच्या हत्येशी रा. स्व. संघाचा संबंध जोडल्याप्रकरणी सीताराम येचुरी व राहुल गांधी यांच्याविरोधात वकील धृतिमान जोशी यांनी सप्टेंबर, २०१७ मध्ये खटला दाखल केला होता. गौरी लंकेश यांच्या हत्येशी रा. स्व. संघाचा संबंध जोडल्याने संघाची प्रतिमा मालिन झाल्याचा जोशी यांचा दावा होता.

 

जोशी यांनी दाखल केलेल्या खटल्याच्या सुनावणीसाठी सीताराम येचुरी व राहुल गांधी यांनी आज शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजेरी लावली. यावेळी राहुल गांधी यांनी आपल्याविरोधात आरोप फेटाळत आपण निर्दोष असल्याचे सांगितले. सुमारे अर्धा तास झालेल्या सुनावणीनंतर या दोघांनाही जामीन मंजूर करण्यात आला. यावेळी 'महा एमटीबी'च्या प्रतिनिधीने येचुरी यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयन्त केला मात्र यावर येचुरी यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat