‘भारतरत्न अटलबिहारी स्मृती उद्याना’चे आज उद्घाटन

    04-Jul-2019
Total Views |


 


सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या संकल्पनेतून साकारले थीम पार्क


मुंबई : सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या संकल्पनेतून साकार झालेले भारतरत्न अटलबिहारी स्मृती उद्यानचे आज उदघाटन होणार आहे. दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मृतींना उजाळा देण्याच्या दृष्टीने हे उद्यान उभारण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या अटल स्मृती उद्याना'चे आज सायंकाळी ५ वाजता उदघाटन होईल.

 

मुंबईतील बोरीवली येथील शिंपोली परिसरात हे उद्यान उभारण्यात आले आहे. याविषयी माहिती देताना विनोद तावडे म्हणाले, ‘भारतरत्न अटलबिहारी स्मृती उद्यानहे अटलजींच्या जीवनाचे, त्यांच्या कार्याचे, कर्तृत्वाचे दर्शन घडविणारे थीम पार्क असून या स्मृती उद्यानातील छायाचित्रे, ध्वनिचित्रफीती, ३डी होलोग्राम, पुस्तके या माध्यमांतून अटलजींचा जीवनपट पर्यटकांना अनुभवता येणार आहे.

 

या उदघाटन सोहळ्याला उद्योगमंत्री सुभाष देसाई, शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार, पर्यावरणमंत्री रामदास कदम, खासदार गोपाळ शेट्टी यांच्यासह इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. उद्यानाच्या उदघाटनानंतर मुख्य कार्यक्रम सायंकाळी ६ वाजता प्रबोधनकार ठाकरे नाटय़गृह, बोरिवली पश्चिम येथे होईल.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat