उद्योजक विवेक देशपांडे पंतप्रधान प्रचार- प्रसार अभियानाच्या राष्ट्रीय कार्यकारणीवर

    दिनांक  04-Jul-2019

 
 
 
 
 
मुंबई (प्रतिनिधी) : 'जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट' सदस्य, 'रुद्राणी इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड'चे अध्यक्ष आणि प्रसिद्ध उद्योजक विवेक देशपांडे यांची पंतप्रधान प्रचार- प्रसार अभियानाच्या राष्ट्रीय कार्यकारणीवर निवड झाली आहे. देश विदेशात राष्ट्राची प्रतिमा उंचविण्यासाठी जनहितार्थ योजना, कठोर निर्णय आणि विविध उपक्रमांची माहीती सर्वसामान्य नागरिकांना मिळावी यासाठी हे अभियान चालवण्यात येत आहे. या कार्यकरणीवर यांची नियुक्ती झाल्यानंतर जनहित योजनांचा प्रचार, प्रसार आणखी व्यापक स्तरावर करणार असल्याचे देशपांडे यांनी सांगितले.
 
 

नियुक्तीनंतर दैनिक 'मुंबई तरुण भारत'शी बोलताना ते म्हणाले, "केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र सरकारच्या नेतृत्वाखाली अनेक जनहित योजनांची आणि लोकोपयोगी कामांची पायाभरणी गेल्या पाच वर्षांत झाली आहे. येत्या काळात राज्यासह देशपातळीवर त्याचा प्रभाव प्रसार सरकार आणि अन्य संस्था करणार आहेत." दरम्यान, येत्या अर्थसंकल्पातही केंद्र सरकार 'सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास'ही जिंकेल असे मत त्यांनी नोंदवले.

 
  

देशातील तळागाळातील जनतेपर्यंत सरकारी योजना पोहोचवण्यासाठी बांधणी कारण्यात आलेल्या या समिती मार्गदर्शक मंडळात भाजप राष्ट्रीय उपाध्यक्ष शाम जाजू, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक आदी मान्यवरांचा सामावेश आहे. या कार्यकारणीवर आता देशपांडे यांचीही निवड झाली असून देश विदेश पातळीवर देशाच्या उत्थानासाठी ते काम करतील, असा विश्वास प्रचार प्रसार समितीचे राष्ट्रीय महामंत्री अंकित संचेती यांनी व्यक्त केला. उपाध्यक्ष रत्नाकर कुलकर्णी यांनी ही माहिती दिली.

 
 माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat