'मरे' पुन्हा रडे... एक्सप्रेसमध्ये बिघाड

    दिनांक  04-Jul-2019


 


मुंबई : बुधवारी मध्य रेल्वेच्या मोठ्या खोळंब्यानंतर गुरुवारी लोकल सुरुवात होत असतानाच एक्सप्रेसमध्ये बिघाड झाल्याने पुन्हा एकदा मध्य रेल्वेच्या लोकल जवळजवळ अर्धा तास उशिराने चालत होत्या. कल्याण ते ठाकुर्ली दरम्यान एक्सप्रेसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला. यामुळे सीएसएमटीच्या दिशेने येणाऱ्या लोकल सुमारे २५ ते ३० मिनिटे उशिराने धावत आहेत.

 

ऐन गर्दीची वेळ टळून गेल्यानंतर लोकलमध्ये बिघाड झाल्याने प्रवाशांची मोठी गैरसौय टळली आहे. असे असले तरी वाहतूक पूर्वपदावर येण्यासाठी प्रवाशांना वाट पाहावी लागणार आहे. बुधवारी मध्य रेल्वेच्या रविवारच्या वेळापत्रकामुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागला होता. यामुळे प्रवाश्यांचे अतोनात हाल झाले होते.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat