'मिशन मंगल' विषयी अक्षय कुमारची भावूक पोस्ट

04 Jul 2019 17:01:03

 
 

अंतराळ संशोधनावर आधारित स्टार ट्रेक, स्टार वोर्स, ग्रॅव्हिटी यांच्यासारखे चित्रपट आत्तापर्यंत हॉलिवूड मध्ये बनवण्यात आले. मात्र बॉलिवूडमध्ये हा विषय तितक्या सक्षमतेने अद्याप कोणीही मांडलेला नाही. त्यामुळेच आता भारतातील एका ऐतिहासिक घटनेवर आधारित 'मिशन मंगल' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे असे म्हणत भारताच्या मंगळ यान मिशनच्या सत्यकथेवर आधारित 'मिशन मंगल' नावाच्या चित्रपटाविषयी अक्षय कुमारने एक भावूक पोस्ट आज सोशल मीडियावर पोस्ट केली.

 

या चित्रपटात एक लोकप्रिय स्टारकास्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. अक्षय कुमार, विद्या बालन, सोनाक्षी सिन्हा, कीर्ती कुल्हारी, शर्मन जोशी, तापसी पन्नू असे प्रसिद्ध कलाकार चित्रपटात महत्वाच्या भूमिका साकारणार आहेत. दिग्दर्शक जगन शक्ती यांच्या 'मिशन मंगल' या चित्रपटाचे निर्माते स्वतः अक्षय कुमार, आर. बाल्की आणि साजिद नाडियावाला यांचा समावेश आहे.

'मिशन मंगल' हा चित्रपट येत्या १५ ऑगस्टला भारतभर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामुळे प्रेक्षकांचे मनोरंजन तर होईलच पण त्याही पेक्षा जास्त प्रेक्षक असे मिशन करण्यासाठी प्रेरित होतील अशी इच्छा देखील अक्षय कुमारने आज व्यक्त केली.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
 
 
Powered By Sangraha 9.0