मुस्लिम डिलिव्हरी बॉय; झोमॅटोने दिले हे उत्तर

31 Jul 2019 18:06:28


 


झोमॅटो या फूड डिलिव्हरी चेनने अमित शुक्ल नामक व्यक्तीच्या ट्विटला चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे. अमितने झोमॅटोमधून फूड डिलिव्हरी मागवली असता एक मुस्लिम डिलिव्हरी बॉय आल्याचे कळताच त्याने ती डिलिव्हरी कॅन्सल केल्याचे ट्विटरवर लिहिले. यावर प्रत्युत्तर देताना झोमॅटोने
'अन्नाला कोणताही धर्म नसून अन्न हाच एक धर्म' असल्याचे म्हटले आहे.

 

झोमॅटो ही स्वीगी या फूड डिलिव्हरी चेननंतरची एक आघाडीची संस्था आहे. घरबसल्या आपल्याला ही सोय पुरवणाऱ्या या संस्थेविषयी मधल्या काळात त्यांच्या एका कर्मचाऱ्याचा अन्न चाखून बघतानाचा व्हिडीओ वायरल झाल्यामुळे लोकांच्या मनात संभ्रम निर्मण झाला होता. मात्र आत्ताची त्यांची ही भूमिका त्यांना ग्राहकांच्या मनात पुन्हा जागा आणि गमावलेला मान परत मिळवून देईल का हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. दरम्यान झोमॅटो आपली प्रतिमा चांगली करण्यासाठी आता या गोष्टीचा कसा उपयोग करते हे पाहणे देखील महत्वाचे असेल.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0