
#Chhichhore trailer out on 4 Aug 2019 [Friendship Day]... All set for 30 Aug 2019 release... Stars Sushant Singh Rajput and Shraddha Kapoor... Directed by Nitesh Tiwari. pic.twitter.com/pyXPQbZcWP
दंगलच्या बॉक्स ऑफिसवरील अभूतपूर्व यशानंतर पुन्हा एकदा आपल्या कलाकृतीतून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी नितेश तिवारी सज्ज झाले आहेत. 'छीछोर' हा त्यांचा आगामी चित्रपट प्रदर्शनाच्या शेवटच्या टप्प्यावर आला आहे. या पार्श्वभूमीवर चित्रपटाचे एक नवीन पोस्टर आज प्रकाशित करण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये चित्रपटातील संपूर्ण कास्ट एकाच फ्रेममध्ये दिसत आहे आणि त्यावरून त्यांच्या भूमिकेचा ढोबळ अंदाज प्रेक्षकांना या पोस्टरमध्ये दिसू शकेल.
दरम्यान या पोस्टरबरोबरच येत्या ४ ऑगस्टला म्हणजेच फ्रेंडशिप डे च्या दिवशी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करणार असल्याचे देखील चित्रपटकर्त्यांनी जाहीर केल्यामुळे प्रेक्षकांमध्ये सध्या औत्सुक्याचे वातावरण आहे. येत्या ३० ऑगस्टला चित्रपट देशभर प्रदर्शित होईल. या चित्रपटात सुशांत सिंह राजपूत आणि श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. योगायोग म्हणजे श्रद्धा कपूरचे एकाच दिवशी दोन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. त्यामुळे आता प्रेक्षक 'साहो' ला जास्त पसंती देतात की 'छीछोर' ला हे पाहणे औत्सुक्याचे असेल.